अजितदादा , सत्तेची स्वप्न पाहू नका, आम्हीही तुमचे बाप आहोत- चंद्रकांत पाटील

Ajit Pawar-Chandkant Patil

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची जीभ घसरली आहे. सत्तेची स्वप्न पाहू नका, आम्हीही तुमचे बाप आहोत , अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांवर टीका (Chandrakant Patil Criticize Ajit Pawar) केली . कोथरुड येथे भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पार पडल्या, यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.

पुणे महापालिकेच्या १६ प्रभाग सामित्यांसाठी निवडणूक झाली. त्यापैकी ११ जागा या सत्ताधारी भाजपला मिळाल्या.

चार जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वाट्याला आल्या तर लकी ड्रॉ पद्धतीने चिठ्ठी टाकून ठरवण्यात आलेली एक जागा कॉंग्रेसच्या पारड्यात पडली. मात्र चमत्कार होऊन सर्व १६ जागा आपल्याला मिळायला हव्या होत्या असं चंद्रकांत पाटील यांनी भाषण करताना भाजपच्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले.

चंद्रकांत पाटील एवढ्यावरच थांबले नाहीत तर अजित पवारांना पुढची स्वप्नं पडतायत. पण त्यांनी त्यांची एनर्जी वाया घालवू नये आम्ही तुमचे बाप आहोत असं चंद्रकांत पाटील यांनी भाषण करताना म्हटले आहे. पुण्यात भाजपच्या कोथरुड मतदारसंघातील व्यापारी सेलच्या नियुक्त्या करण्यासाठी आयोजित बैठकीत चंद्रकांत पाटील बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER