…तर आम्हाला लॉकडाऊन मान्य नसेल, चंद्रकांत पाटील यांचा सरकारला इशारा

Chandrakant Patil-CM Thackeray

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज पुन्हा जनतेशी संवाद साधत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते लॉकडाऊनबाबत घोषणा करण्याची चिन्हं आहेत. महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. येत्या काही तासात लॉकडाऊन जाहीर केला जाऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नेमकी काय घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, संपूर्ण लॉकडाऊन लावण्यापूर्वी सामान्य जनतेसाठी काही ठोस निर्णय घेण्याची मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे.

एक वर्षांपूर्वी डोळे विस्फारतील असं पॅकेज देऊ, असं हसन मुश्रीफ म्हणाले होते. मात्र, यातील फुटकी कवडी ही कामगारांना मिळाली नाही. कोरोना विषाणू लवकर संपणार नाही. काळजी घेऊन लोकांचं जनजीवन सुरळीत ठेवली पाहिजे. प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यांना आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे. असंघटित कामगारांना काहीच पॅकेज वर्षभरात दिलं नाही. महिनाभर लॉकडाऊन करणार असाल, रेशन, किराणा, भाजी मोफत देऊ अशी घोषणा करा. याची व्यवस्था न करता लॉकडाऊन करणार असाल तर आम्हाला मान्य नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button