
मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Case) प्रकरणावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सरकारला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) जाहीर आव्हान दिले आहे.
सोमवारपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) सुरू होत आहे. सोमवारच्या आत जर राज्य सरकारने संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही, त्यांची चौकशी सुरू केली नाही आणि मुख्यमंत्र्यांनी यावर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवदन करावं, नाहीतर आम्ही या मुद्द्यावर तोंड न उघडणाऱ्या राज्य सरकारला अधिवेशनात तोंड उघडू देणार नाही, सभागृह चालू देणार नाही, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षांच्या वतीने दिला आहे.
या मुद्द्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांच पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री सत्यवादी असून कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे म्हटले होते . त्याचा समाचार घेताना चंद्रकांत पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे हे सत्यवादी आहेत हे मान्य आहे. प्रबोधनकार ठाकरेंचे ते नातू आहेत. पण व्यवहारात ते दिसत नाही. भूमिका घेताना त्यांना स्वत:च्या खुर्चीची काळजी आहे. त्यामुळे संजय राऊतांना ते सत्यवादी कुठे दिसले, ते माहीत नाही, असे पाटील म्हणाले .
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला