चंद्रकांत पाटील यांनी उचलला शहीद जवानाच्या मुलांच्या शैक्षणिक खर्च

Chandrakant Patil - Amal Mahadik - Sangram Patil

कोल्हापूर : जम्मू काश्मीर येथील राजौरी नवुसेरा सीमेवर पाकिस्तानी सैन्याबरोबर झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या वीरजवान संग्राम पाटील (Sangram Patil) यांच्या दोन मुलांची शैक्षणिक जबाबदारी भाजपा (BJP) प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) घेतली. त्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी ५ लाखाचा धनादेश आमदार “चंद्रकांतदादा पाटील प्रणित संवेदना फाऊंडेशन कोल्हापूर ” यांच्या वतीने आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते देण्यात आला.

७२ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संग्राम पाटील यांच्या निगवे खालसा येथील घरी कार्यकर्त्यांसह भेट देवून कुटुंबीयांचे सांत्वन करून आधार दिला. आमदार अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वडील शिवाजी पाटील यांच्याकडे अडीच लाखाचा धनादेश व पत्नी हेमलता यांच्याकडे अडीच लाखाचा धनादेश दिला. यावेळी आई साताबाई, बंधू संदीप, मुलगा शौर्य व मुलगी शिवश्री यांची आस्थेने चौकशी केली.

भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस नाथाजी पाटील यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांनी संग्राम पाटील यांच्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी घेण्याचा शब्द दिला होता. तो पाळला असून ५ लाखाच्या धनादेशातून आगामी काळात येणारा शैक्षणिक खर्च केला जाणार आहे अशी माहिती दिली. यावेळी करवीर तालुकाध्यक्ष हंबीरराव पाटील, राधानगरी तालुकाध्यक्ष संभाजी आरडे, मौनी विद्यापीठ संचालक अलकेश कांदळकर, प्रसिद्ध प्रमुख महेश पाटील, विलास रणदिवे , प्रतापसिंह पाटील, बी. डी. किल्लेदार, जगदीश चौगले, रंगराव तोरस्कर, संभाजी किल्लेदार, तुषार पाटील, विलास कांजर, टी. के. किल्लेदार, अशोक पाटील, महादजी पाटील, सागर कोपर्डेकर, विकास चौगुले व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER