ठाकरे सरकार लांडग्यासारखे कंगनाच्या मागे लागलेत : चंद्रकांत पाटील

Uddhav thackeray -Chandrakant Patil

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला महिलांचे संरक्षण करायला शिकवले. मात्र ठाकरे सरकार (Thackeray Govt)कंगनाच्या मागे लांडग्यासारखे लागले असल्याची टीका भाजप (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राज्य सरकारवर केली आहे .

स्वत:ला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून घेणाऱ्यांना हे शोभत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतून प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. कोणीही देशात कुठेही जाऊ शकतो, असे म्हणत पाटलांनी शिवसेनेवर (Shivsena) निशाणा साधला आहे.

दरम्यान अभिनेत्री कंगणा राणावतने शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका करताना मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखे वाटते, असे म्हटले होते . कंगणाच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेने तिचा चांगलाच समाचार घेतला . यावर मुंबई कुणाच्या बापाची नाही, मुंबईत येत आहे हिंमत असेल तर अडवून दाखवा , असे खुले आव्हान कंगनाने शिवसेनेला दिले आहे . यावरून चांगलेच वादंग पेटले आहे .

ह्या बातम्या पण वाचा : 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER