अजितदादा तुमचा धाक कायम ठेवण्यासाठी पुण्यात दररोज या – चंद्रकांत पाटील

ajit pawar-chandkant patil

पिंपरी चिंचवड : प्रत्येकाची कार्य करण्याची एक पद्धत असते, तशी अजितदादांची आहे. पण तुमचा धाक आहे ना, तो आठवड्यातून एकदा येऊन चालणार नाही. रोज येऊन बसावं लागेल, असा सल्ला भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला. अजित पवारांनी कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचे प्रकार समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी प्रतिक्रिया देत अजित पवारांच्या (Ajit Pawar) कार्यपद्धतीचे गोडवे गायले.

काम होत असेल तर जागेवरच सोक्ष-मोक्ष, पण काम होणार नसेल तर नाही म्हणून स्पष्टपणे सांगणे अशी अजित पवारांची ओळख आहे.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, आरडाओरडा करुन, धाकदपटशाने माणसं काम करत नाहीत. अतिशय प्रेमाने त्यांच्या अडचणी समजून घेऊन आपल्याला काम करावं लागतं. पण प्रत्येकाची एक कार्यपद्धती असते, तशी दादांची (उपमुख्यमंत्री अजित पवार) आहे. पण वारंवार माझं तेही म्हणणं आहे, की दादांनी ही कार्यपद्धती अवलंबण्यासाठी रोज पुण्यात यायला हवं. सकाळी ७ ते १ मुंबईत काम करायचं, एकला निघायचं पिंपरी करायचं, पुणे करायचं, रात्री १० ला परत जायचं. मुळात मुंबईत सध्या कामं काय आहेत, हेच मला कळत नाही, पण आहेत. ७ ते १ मुंबई, १ ते ३ प्रवास, ३ ते ५ पिंपरी, ५ ते ९ पुणे.. तुमचा धाक आहे ना, तो आठवड्यातून एकदा येऊन चालणार नाही. पुण्यात रोज येऊन बसावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER