निर्णयाचे स्वागत मात्र जीआरमध्ये मेख मारू नका : चंद्रकांत पाटील

Chandrakant patil

कोल्हापूर : मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो, मात्र अंमलबजावणी करताना `जीआर’मध्ये मेख मारु नका असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कोल्हापुरात आज पत्रकार परिषदेत बोलताना दिला.

आ. पाटील म्हणाले, स्थगिती मिळाल्यानंतर, मराठा समाजासाठी आम्ही आग्रह राज्य सरकारकडे धरला होता. त्यानुसार आमच्या सरकारने 642 अभ्यासक्रमांच्या फीमध्ये सवलत दिली होती. नवोदीत उद्योगासाठी 10 लाखांपर्यंतच्या कर्जाचे व्याज अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून भरण्याचा निर्णय घेतला होता. युपीएससी शिष्यवृत्ती, ग्रामीण दोन हजार तर विद्यार्थ्यांना तीन हजार निर्वाह भत्ता दिला जात होता. सारथी संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चालना दिली महाविकास आघाडीने यापैकी बहुतांशी सवलती सूरु ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मराठा समाजाला थोडाफार दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. केवळ विरोधक म्हणून नाहीतर समाजाच्या चांगल्यासाठी दोघेही यापुढे आरक्षण मिळावे यासाठी लढू.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER