राज्यात राजकारणाचे गुन्हेगारीकरण सुरू; चंद्रकांत पाटलांची टीका

Chandrakant Patil

मुंबई :- राज्यात राजकारणाचे गुन्हेगारीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे राज्यात कुणालाच कुणाचा धाक उरला नाही, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakanbt Patil) यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर (Thackeray Govt) निशाण साधला. भाजपच्या (BJP) कार्यकारिणीची बैठक आज पार पडली. त्यानंतर पाटील यांनी पत्रकरांशी संवाद साधला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणे राजकारण समाजकारणाचं माध्यम आहे. कायदे करण्याचं माध्यम आहे. पण इथे या, गुन्हे करा आणि राजकीय नेते असल्याने तुम्ही अशा प्रकरणातून बाहेर पडू शकता. तुमचं कुणी काहीही वाकडं करू शकत नाही, असं सगळं सध्या राज्यात सुरू आहे. राज्यात हम करे सो कायदा सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

राजकारणाचे गुन्हेगारीकरण सध्या सुरू आहे. मधल्या काळात आंदोलने झाली. त्यामुळे सरकारमध्ये बदल झाले. त्यानंतर महाराष्ट्र स्थिर झाला. राज्यात कायद्याची भीती निर्माण झाली होती. राज्याचे गुन्हेगारीकरण झाले नव्हते. मात्र आता जगात जे जे काही गुन्हे आहेत ते गुन्हे राज्यातील कोणत्या ना कोणत्या मंत्र्याशी जोडले गेले आहेत, असे पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER