शिवसेनेला शेतकरी हितापेक्षा स्वार्थ महत्वाचा वाटतो : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil-Uddhav Thackeray.jpg

कोल्हापूर : जाणता राजा म्हणवून घेणारे शरद पवार (Sharad Pawar) राज्यसभेत चर्चेला उपस्थित राहत नाहीत, शिवसेना (Shivsena) लोकसभेत पाठिंबा देते आणि राज्यसभेत त्याला विरोध करते. हा सगळा सावळा गोंधळ आहे. त्यांना शेतकरी हितापेक्षा स्वत:चा स्वार्थ महत्वाचा वाटतो, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत हाणला.

आ. पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सामान्य कुटुंबातून आल्याने आणि त्यांना शेतकर्‍यांच्या समस्या माहीत असल्याने ते शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहेत. तरीही केवळ राजकीय विरोध म्हणून या नव्या विधेयकाला काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने सभागृहात विरोध केला. शिवसेनेने तर पहिल्या दिवशी लोकसभेत पाठिंबा दिला आणि दुसऱ्या दिवशी राज्यसभेत विरोध केला. त्यांना एका दिवसात असा काय साक्षात्कार झाला हेच कळले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER