महाविकास आघाडीचे फासे पडत आहेत उलटे

Chandrakant Patil slams Mahavikas Aghadi

मुंबई :- उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani Bomb case) यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली, या प्रकरणात NIA ने वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे याला अटक केली. राज्यातील सरकारच्या अडचणी सुरू झाल्यात. नंतर, गृहमंत्र्यांनी ‘१०० कोटींचे टार्गेटदिले होते. असा आरोप करून माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सरकारची अब्रू धुळीला मिळवली.

या प्रकणात स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी ‘सत्यमेव जयते’चा घोष करत चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. मात्र, अनिल देशमुख यांनी २१ मार्चला लिहिलेले पत्र २४ मार्चला सार्वजनिक करण्यात आले. यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी टीका करून ‘अनिल देशमुखांवर तोंड उघडू नको म्हणून वरिष्ठांचा दबाब.. तर नाही ??’ असा टोमणा मारला.

पाटील यांनी ट्विट केले – अनिल देशमुखांकडून २१ तारखेला पत्र लिहून घेतले गेले, ते ४ दिवस प्रलंबित ठेऊन २४ तारखेला प्रसिद्ध केले. १०० कोटींच्या वसुलीचे आरोप व पत्रात व्हाट्सअँप-एसएमएसची भाषा. पुन्हा एकदा जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न? अनिल देशमुखांवर तोंड उघडू नको म्हणून वरिष्ठांचा दबाब.. तर नाही ?? पाटील यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन या प्रश्नासोबतच पत्राचा फोटो शेअर केला आहे.

अनिल देशमुख यांनी लिहिलेलं पत्र