‘अशोक चव्हाणांनी औकातीत राहावं !’ चंद्रकांत पाटलांची संतप्त प्रतिक्रिया

कोल्हापूर :- चंद्रकांत पाटलांना (Chandrakant Patil) मराठा आरक्षण (Maratha reservation) कायद्यातील काय कळतंय? ते काहीही चुकीची माहिती देतात, अशी टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केली. या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अशोक चव्हाणांनी औकातीत राहावं, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

“अशोक चव्हाणांनी केंद्र सरकारवर बोट दाखवू नये. त्यांनी स्वत: राज्यासाठी काही तरी करून दाखवावे. चव्हाणांनी औकातीत राहावे. त्यांची औकात काय आहे हे आम्हाला माहीत आहे. आम्ही काय करावे ते आम्हाला सांगू नये.” अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.

आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणावरही भाष्य केले. राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करायला पाहिजे होती. केंद्राने मराठा आरक्षणाबाबत पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. दाखल केलेली ही याचिका म्हणजे हवेची गार झुळूक आहे. आता महाराष्ट्रानेही ही याचिका दाखल करावी, असे ते म्हणाले. १०२व्या घटनादुरुस्तीने मराठा समाजाला न्याय मिळाला, तर मराठा मागास आहे की नाही, यावर ५० टक्क्यांवरील आरक्षणाच्या निकषावर राज्य सरकारने काम केले पाहिजे, अशी सूचनाही पाटलांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button