चंद्रकांत पाटलांनी साडेचार वर्षे वाट बघावी; आघाडी सरकार पाच वर्षे चालेल- शरद पवार

Sharad Pawar & Chandrakant Patil

पुणे :- “सरकार आज पडेल उद्या पडेल या अपेक्षेने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नेहमीच कपडे घालून तयारच असतात; मात्र महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करेल. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना साडेचार वर्षे  वाट पाहावी लागेल. पण चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या वन फाईन मॉर्निंगला माझ्या शुभेच्छा !” असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला. पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी जोरदार टोलेबाजी केली.

राज्याच्या राजकारणात वन फाईन मॉर्निंग अचानक काही तरी घडेल, अशी भविष्यवाणी चंद्रकांत पाटील यांनी वर्तवली होती. पाटील यांच्या याच वक्तव्यावर पत्रकारांनी पवारांना प्रश्न विचारला असता, सरकार पडेल या अपेक्षेने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कपडे घालून तयारच असतात, असा टोला पवारांनी लगावला. चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणावर बोलताना पवारांवर टीका केली होती. त्यांच्या टीकेलादेखील पवारांनी उत्तर दिलं. मराठा आरक्षणाबाबत विस्मरण झालं असावं, मलाही थोडीफार माहिती आहे; मात्र मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले आहे, असा टोला त्यांनी लगावला.

ही बातमी पण वाचा : मोदी सरकारचा  ‘तो’ निर्णय अनुकूल, पंतप्रधानच्या आवाहनाला शरद पवारांची साथ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER