आदित्य ठाकरेंसाठी मुलगी बघायची झाल्यास ते केंद्राला सांगतील; चंद्रकांत पाटलांचा टोला

पुणे : मराठा आरक्षणावरून भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेनेला (Shivsena) टोला लगावला आहे. मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) केंद्राला जबाबदार धरणाऱ्या आघाडी सरकारची गत अशी झालीय की उद्या आदित्य ठाकरेंसाठी (Aditya Thackeray) मुलगी पाहायची असेल तर हे दिल्लाला सांगतील, की आधी तुम्ही तिथून बघा मग आम्हाला कळवा, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी विविध मुद्द्यांवरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.

“ओबीसीचे आरक्षण रद्द होण्याच्या मुद्द्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे. गेली दीड वर्ष हे सरकार झोपले होते, कोर्टाने दिलेल्या निर्णयातून स्पष्ट दिसून येते. राज्य सरकार ओबीसी आरक्षण असो किंवा मराठा आरक्षण यावरून सारखे केंद्राकडे बोट दाखवत असतात. या सरकारमध्ये उद्या आदित्य ठाकरेंसाठी मुलगी पाहायचे झाले तर हे दिल्लीला सांगतील. तुम्ही तिथे आधी बघा मग आम्हाला सांगा.” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

शरद पवार आणि फडणवीसांची भेट राजकीय नाही

शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट राजकीय नव्हती. ते आजारी असल्यामुळेच फडणवीस त्यांना भेटायला गेले होते. त्यांनी शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली. यामध्ये काहीही राजकीय नव्हते. आजदेखील देवेंद्र फडणवीस हे जळगावात नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

ही बातमी पण वाचा : सरकारने मराठा आरक्षणाच्या जबाबदारीतून पळ काढण्याचा प्रयत्न करु नये – चंद्रकांत पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button