चंद्रकांत पाटील विरोधकांना आयुष्यातून उठवतात : मंत्री हसन मुश्रीफ

Hassan Mushrif

कोल्हापूर : भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचे दोन स्वभाव आहेत. एक दिसायला मृदू , लोकांना मदत करणारा, विचार न करता मुक्त वक्तव्य करणारा, दिसायलाही प्रांजळ. दुसरा स्वभाव म्हणजे मिळालेल्या सत्ता व संपत्तीचा, आपला कोणीही विरोधक मग साधा टिका करणारा असो. त्याचा काटा काढायचा व त्याला जीवनातून उठवण्याचाच प्रयत्न करणारा असा आहे, अशी खरमरीत टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी गुरूवारी पत्रकाव्दारे केली.

आ. पाटील यांनी मुश्रीफ यांना लिहिलेल्या पत्र लिहून टीका केली होती. त्यास उत्तर देताना आ. पाटील यांनी आपल्या दोन चेहऱ्याबाबत मुक्तचिंतन करावे, असे प्रत्युत्तर मुश्रीफ यांनी दिले आहे. पत्रात मुश्रीफ यांनी म्हटले आहे, कोरोनासदृश्य संकटकाळामध्ये पाटील कोल्हापूरकडे पाठ फिरवली व मदत दिली नाही, असे वक्तव्य मी केले नाही. तरीही त्यांनी खुलासा करत पत्र लिहून कोरोना संकटांमध्ये किती मदत केली हे जाहीर केले. यानिमित्ताने पाटील यांना संधीच मिळाली. गेल्या पाचवर्षांमध्ये त्यांना मिळालेली सत्ता व संपत्ती यांचा विचार करता दोन – तीन लाख लोकांना पाच वर्षे ते सहज मदत कराल याची खात्री आहे. मी किंवा माझ्या फौंडेशनने केलेली मदत जाहीर केली तर पुन्हा ईडी, इन्कमटॅक्स मागे लावतील. त्यामुळे जाहीर करत नाही.

मी चंद्रकांत पाटील यांचा शत्रू नव्हे वैचारिक विरोधक आहे. परंतु; माझे राजकारण संपविण्यासाठी केडीसीसी बँकेची कलम ८८ कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांच्यावर दबाव आणला, एमएससी बँकेवर ८८ ची कारवाई सुरु केली. सहकार क्षेत्रामध्ये राहूच नये म्हणून दहा वर्षे पूर्वलक्षी प्रभावाने अध्यादेश काढून चंद्रकांत पाटील यांनी कायदा केला. वित्त आयोगाचा निधी आणि अर्सेनिक अल्बम गोळ्या खरेदी प्रकरणावरही आक्षेप घेतला. आ. पाटील माझी बदनामी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मिळालेली सत्ता सर्वसामान्यांच्या लक्षामध्ये राहिल अशी राबवली पाहिजे. विनाकारण व्यक्तिगत टीका करून तुमची यांची बदनामी करणार नाही, अशी खात्रीही मुश्रीफ यांनी या पत्रात व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER