नव्या राजकीय नांदीचे संकेत, भाजप-मनसे युतीबाबत चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान

पुणे : बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (MNS) मेगा भरती झाली. विशेष म्हणजे या मेगा भरतीत उत्तर भारतीयांचा मोठा सहभाग होता. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे  (Raj Thackeray) यांच्या प्रमुख उपस्थितीत ५००च्या वर उत्तर भारतीयांनी मनसेचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे मनसेने आता परप्रांतीयांबद्दल मावळ भूमिका घेतली असल्याचे बोलले जात आहे. मनसेने घेतलेल्या या भूमिकेवरुन आता राज्यात नव्या राजकीय नांदीचे संकेत मिळाले आहे. भविष्यात मनसे-भाजप युती होणार का? असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून विचारला जात आहे.या प्रश्नाला उत्तर देतांना भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मोठे विधान केले आहे.

कोणी आपला पक्ष कसा वाढवायचा, हा त्यांचा अधिकार आहे. त्यांना तसे स्वातंत्र्य आपल्या लोकशाहीने दिले आहे. मनसेमध्ये अमराठी सहभागी होत असतील, तर ही चांगली गोष्ट आहे. मनसेच्या देशभक्ती आणि हिंदुत्वाबद्दल शंका नाही. त्यामुळे मनसेसोबतच्या युतीबाबत तुम्ही विचारत असाल, तर मनसेसोबत युती शक्य आहे, पण त्यांनी अन्य प्रांतियांबद्दलची भूमिका बदलली पाहिजे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

यावेळी त्यांनी राज्यातील ठाकरे सरकारावरही निशाणा साधला. महाविकास आघाडीला लोकांनी निवडून दिलेले नाही. गिमिकने त्यांनी सत्ता स्थापन केली. त्यामुळे लोकांना ते उत्तरदायी नाहीत, असं त्यांना वाटतंय. म्हणून हम करेसो कायदा, अशी त्यांची प्रवृत्ती आहे. भारतरत्नने सन्मानित विक्रमादित्य सचिन तेंडुलकर, गानकोकीळा लता मंगेशकर यांनी देशहिताचे ट्वीट केले आहेत त्याची तुम्ही चौकशी करता? त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य काही आहे की नाही? असे सगळे विषय एका बाजूला चाललेत, अशी टीकाही चंद्रकांतदादांनी केली.

पुण्यातील तरुणी पूजा चव्हाणच्या आत्महत्येला 48 तास झाले, काही कारवाई नाही. पोलीस म्हणतात की तरुणीच्या नातेवाईकांनी तक्रार द्यायला हवी, पण सुमोटो कंप्लेन्ट लॉन्च नाही का करता येत? कायदा विषय संपला का, तुम करे सो कायदा आहे का? असे प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केले.

राज्यपालांना विमान नाकारणे हे कदृपणाचे, क्षुद्रपणाचे लक्षण आहे. साधारणपणे राज्यपालांना जेव्हा प्रवासाला जायचे असते तेव्हा मुख्यमंत्री कार्यालयाकडे फाईल पाठवायची असते आणि ती तत्काळ क्लिअर करायची असते. पण ती झाली नाही, त्यामुळे राज्यपालांना खाजगी विमानाने जावे लागले, हे द्वेषाचं, सुडाचं टोक आहे,असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER