‘अशा भेटी होतच असतात’, राऊत आणि फडणवीसांच्या भेटीवर चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान

Chandrakant Patil

पुणे : आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिवसेनेचे (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात झालेल्या गुप्त भेटीनंतर राजकीय क्षेत्रात तर्कवितर्क लावले जात आहे. या बैठकीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandra Kant Patil) यांनी “अशा भेटी होतच असतात”, असं सूचक विधान केलं आहे.

देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात अशी काही भेट झाल्याची माहिती माझ्यापर्यंत आलेली नाही. किंबहुना आज संध्याकाळी कार्यकर्त्यांचा खूप मोठा वेबिनार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात दीड लाखांपेक्षाही जास्त लोक सहभागी झाले. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसही होते, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

राजकीय क्षेत्रात भिन्न विचारांचे भिन्न पक्षाचे लोक असे अधूनमधून भेटत असतात. पण त्यातून काहीतरी बातमी निर्माण होईल, असं नाही. गेल्या नऊ महिन्यांमध्ये सरकार जाणार अशी चर्चा सुरु आहे. पण देवेंद्र फडणवीस, मी किंवा आमचे कुठलेच नेते हे सरकार पडेल, असं म्हणाले नाहीत. हे सरकार जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करत नाही. पण हे सरकार अंतर्गत विरोधांमुळे पडेल, असं सर्वसामान्य जनता म्हणत आहे. हे सरकार पडेल तेव्हा पडेल. पण आम्ही त्यात कोणतीही भूमिका बजावणार नाही, असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER