…तरीही मुख्यमंत्र्यांना राऊत हेच जास्त प्रिय आहे – चंद्रकांत पाटील

Chandrakant patil & Uddhav Thackeray & Sanjay raut

कोल्हापूर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हेच मुख्यमंत्र्यांना दररोज वेगवेगळी विधानं करून अडचणीत आणत आहेत. तरीही मुख्यमंत्र्यांना राऊत हेच जास्त प्रिय आहेत. सामना म्हणजे संजय राऊत, संजय राऊत म्हणजे सामना, असं आहे का? हे उद्धव ठाकरे यांनीच स्पष्ट करावे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकारला (mva government) वर्ष पूर्ण झाले आहे. वर्षपूर्तीनिमित्ताने एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackrey ) यांनी मुलाखतीतून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. तर दुसरीकडे ‘भारतीय जनता पार्टी एकटी सर्वांना पुरून उरली आहे. त्यामुळे त्यांचा  थयथयाट अपेक्षित आहे. जो समर्थ माणूस असतो, त्याला शत्रू जास्त असतात.’ अशी टीका पाटील यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER