याच मोदींनी संभाजीराजेंना राष्ट्रपती कोट्यातून खासदारकी दिली : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil on Sambhaji Raje over Maratha reservation

मुंबई :- सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) कायदा रद्द ठरावाला. त्यानंतर खासदार संभाजीराजे भोसले यांनी आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतली. “माझा राजीनामा देऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल आणि समाजाला न्याय मिळत असेल, तर मी खासदारकीचा राजीनामा देईन.” असे मत संभाजीराजे यांनी व्यक्त केले आहे. संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची भेट मागितली होती. परंतु मोदींनी भेट दिली नसल्याचे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) भाष्य केले.

“पक्ष म्हणून भाजपने संभाजीराजे यांना किती सन्मान दिला हे ते सांगत नाहीत. छत्रपती संभाजीराजे हे छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज आहेत. त्यांना राष्ट्रपतींच्या कोट्यातून खासदारकी देण्यात आली. यानंतर त्यांची ओळख करून देण्यासाठी एकदा अमित शाह यांनी त्यांना प्रयागराजला राष्ट्रीय बैठकी त्यांचे अभिनंदन आणि ओळख करून देण्यासाठी बोलावले. त्यावेळी मी त्यांना चार्टर फ्लाईटने घेऊन त्या ठिकाणी गेलो होतो.” असं पाटील म्हणाले.

“त्यांना किती सन्मान दिला, त्यांची किती कामे मार्गी लावली, रायगड विकासासाठी किती निधी दिला हे ते सांगत नाहीयेत आणि इतरांना ते माहित नाही. कोरोनामुळे (Corona) आणि दुसरे म्हणजे ज्यासाठी ते भेट मागत आहेत, त्यांचे समाधान माझ्याकडे नाही तर राज्याकडे आहेत. या कारणांमुळे त्यांची भेट झाली नसावी. मोदींनी भेट दिली नाही म्हणून ते ओरडत आहेत. याच मोदींनी त्यांना राष्ट्रपती कोट्यातून खासदारकी दिली.” असेही पाटील म्हणाले.

ही बातमी पण वाचा : पवारांच्या भेटीने काहीही साध्य होणार नाही; विनायक मेटेंचा संभाजी राजेंना टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button