पवारांचं राजकीय कौशल्य खरोखर मोठं, त्यांच्यावर पीएचडी करतोय – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil - Sharad Pawar

कोल्हापूर : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant-patil) यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) छोटे नेते म्हटल्यानंतर राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला होता. त्यावर आता पाटील त्यांनी स्पष्टीकरण दिलं असून ते वक्तव्य व्यक्तिगत त्यांच्याबाबत नव्हतं, तर सर्वांबद्दल होतं, असं म्हटलं आहे.

एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. तसंच आपण शरद पवारांवर पीएच.डी. करत असल्याचं ते म्हणाले आहेत. शरद पवारांचं स्वत:भोवती राजकारण फिरवत ठेवण्याचं कौशल्य खरोखर मोठं आहे, असं म्हणत त्यांनी कौतुक केलं आहे. शेती, साखर या गोष्टीत शरद पवारांएवढा अभ्यास कुणाचा नाही.

त्यांच्याबद्दल मी अनेकदा गौरवोद्वार काढले. राजकारणात येण्यापूर्वी मला पवार मोठे नेते वाटायचे; मात्र राजकारणात आल्यावर कळाले ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. “उद्धव ठाकरेंचा अभ्यास नाही. त्यांना कामकाजाची माहिती नाही.

मंत्रालय कुठे आहे, मंत्र्यांची दालने कितव्या मजल्यावर आहेत हेदेखील त्यांना माहिती नव्हतं. शरद पवार यांनी अचानकपणे उद्धव ठाकरेंच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याआधी आमदार, नगरसेवक होते. मीदेखील रात्री ३ वाजेपर्यंत अभ्यास करायचो. नरेंद्र मोदीही अचानक मुख्यमंत्री झाले; पण त्यांनी अभ्यास केला. उद्धव ठाकरेंना विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली नाहीत. ” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांवर बोलणाऱ्यांची लायकी काय आहे?; उद्धव ठाकरेंचे चंद्रकांत पाटलांना खडेबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER