‘मराठा समाज पुढे जाऊ नये हीच खबरदारी राष्ट्रवादी-काँग्रेसने घेतली’ – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

मुंबई :- राज्यात इतर मुद्द्यांसोबत आता मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दाही तापताना दिसून येत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला. १५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. मात्र त्यांना केवळ राजकारणाची काळजी होती, मराठ्यांची नाही. मराठा समाजाची मते हक्काने घ्यायची, पण त्यांना आहे तसेच राहू द्यायचे. हेच तुमचे धोरण होते, अशा शब्दात पाटील यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसवर (NCP-Congress) टीकास्त्र सोडले.

मराठा आरक्षण याचिकांवर पुन्हा एकदा सुनावणी सुरू झाल्यानंतर राज्यात हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भूमिकेवर पाटील यांनी ट्विट करून निशाणा साधला आहे.

“तुम्हा प्रस्थापितांना गरीब मराठ्यांना कधी आरक्षण द्यायचेच नव्हते. १५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार राज्यात होते. मात्र तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी होती, मराठ्यांची नाही. मराठा समाजाची मते हक्काने घ्यायची, पण त्यांना आहे तसेच राहू द्यायचे. हेच तुमचे धोरण होते. मराठा समाजाच्या नावाने राष्ट्रवादी-काँग्रेसने महाराष्ट्रात एवढी वर्ष राजकारण केलं. पण मराठा समाज कधीही आपल्या पुढे जाणार याचीच खबरदारी राष्ट्रवादी-काँगेस पक्षाने आजपर्यंत घेतली!,” असं पाटील यांनी म्हटलं आहे.

पाटील आणखी एक ट्विट यासंदर्भात केलं आहे आहे. ज्यात ‘अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाची प्रलंबित असणारी मागणी भाजपा सरकारने निकराचा लढा देऊन पूर्ण केली. मराठा समाजाला उद्भवणाऱ्या अडचणी पाहता मराठा समाजाला आरक्षण मिळणे हे अत्यंत गरजेचे आहे. पण महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खेळ खंडोबा केला!,’ असा आरोप केलेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER