सरकार टिकवण्यासाठी मुख्यमंत्री काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावापुढे झुकत आहेत- चंद्रकांत पाटील

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhva Thackeray) मौन बाळगून असल्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादी (NCP) त्यांना हवे ते निर्णय घेत आहेत. मुख्यमंत्री हे सरकार वाचवण्यासाठी कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या दबावापुढे  झुकत आहेत. एवढेच नाही तर, बॅंक घोटाळ्यात अजित पवारांना क्लीन चिट हा याचाच भाग असल्याची घणाघाती टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर केली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्य बँक घोटाळा काय आहे हे मुख्यमंत्र्यांना माहीत तरी आहे का, असा सवाल करत पाटील म्हणाले, राज्य बँकेत नियमबाह्य पद्धतीने साखर कारखान्यांना कर्ज देणे आणि स्वस्त दरात साखर कारखाने खरेदी करण्यात कोट्यवधींचा घोटाळा झाला.  काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना हवे ते निर्णय घेत असताना मुख्यमंत्री बघ्याची भूमिका घेत आहेत, असा हल्ला शाब्दिक हल्ला चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर चढवला आहे.

मराठा आरक्षणाबाबत बोलताना पाटील म्हणाले, मराठा आरक्षण टिकण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करणार असा ठराव मंजूर करण्यात आला. तर, महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राज्यभर १२ ऑक्टोबर रोजी भाजपकडून निदर्शने करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER