आम्ही रेमडेसिवीर पाकिस्तान किंवा चायनाला देणार होतो काय?- चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil AND Remedesivir injection

पुणे : आम्ही रेमडेसिवीर (Remedesivir injection) घेऊन काय पाकिस्तानला किंवा चायनाला देणार होतो का? महाराष्ट्रालाच देणार होतो. मग रेमडेसिवीर घेतल्या तर चुकले कुठे? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, “विरोधी पक्षनेत्याला मुख्यमंत्र्यांसारखेच अधिकार असतात. ते माहिती घेऊ शकतात. घटनेतच तशी तरतूद आहे. त्यामुळे त्यांनी पोलिसांना जाब विचारला. कोणालाही उचलून आणायला काय महाराष्ट्रात बेबंदशाही आहे का?”

विष तर वाटत नाही ना?
“आम्ही रेमडेसिवीरचे वाटप केले तर त्यात काय चुकले? विष तर वाटत नाही ना? लोकांना इंजेक्शन हवे आहे. लोक वणवण भटकत आहेत. २२ तारखेला रेमडेसिवीर उपलब्ध होईल. त्यानंतर तुम्हाला कोणी विचारणारही नाही. लोकांना मदत करणे चुकीचे आहे का? रोहित पवारही मदत करत आहेत. ते योग्यच आहे. तुम्हीही मदत करा. तुम्हाला कोणी अडवले आहे? लोकांना मदत केलीच पाहिजे. भाजपचे लोक घरदार विकून लोकांना मदत करत आहे. करू द्या ना, तुम्हीही करा.” असे पाटील यांनी सांगितले.

सरकारी यंत्रणा कुठे आहे?
पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले की, “सरकारची यंत्रणा कुठे आहे? मला आता काही हॉस्पिटल्सचा फोन आला. अजूनही लस आली नसल्याचे त्यांनी सांगितले. लसीकरणाचा खोटा प्रचार सुरू आहे. तो त्यांच्या लक्षात आला आहे. जसा जसा साठा येईल तसा पुरवठा केला जाईल. पुण्यात सहा लाख लसीकरण झाले.”

राऊतांवर पुस्तक लिहितोय!
यावेळी पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली. “मी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर पीएच. डी. करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर M. Phil. करत आहे. आणि संजय राऊतांवर पुस्तक लिहीत आहे. काय बोलावे राऊतांबद्दल ! ते वर्णन करण्यापलीकडचे व्यक्तिमत्त्व आहे.” असा चिमटा पाटलांनी काढला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button