थेट पाईपलाईनची चिरफाड करू : चंद्रकांत पाटील यांचा इशारा

Chandrakant Patil

कोल्हापूर :- थेट पाईपलाईन (Pipeline scheme) योजनेतील अडीच कोटी रुपये वाचवून भाजप (BJP)- ताराराणी आघाडीने या योजनेतील भ्रष्टाचार उघड केला आहे. त्यामुळे आता थेट पाईपलाईन योजनेची चिरफाड करावी लागेल, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी दिला.

भाजप नगरसेवक अजित ठाणेकर यांच्या पंचवार्षिक कार्यपुस्तिकेच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे उपस्थित होते. आ. पाटील म्हणाले, आणखी दोन सदस्य असते, शिवसेनेने साथ दिली असती तर महापालिकेवर भाजपची सत्ता आली असती. सत्ता नसली तरी प्रबळ विरोधी पक्ष म्हणून भाजप-ताराराणी आघाडीने महापालिकेतील कारभारावर अंकुश ठेवण्याचे काम केले आहे. थेट पाईपलाईन योजनेत लोखंडी पुलाच्या खर्चात अडीच कोटी रुपये वाचविले. भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे हे एक टोक आहे. याच्या खाली भरपूर आहे. खालचा भ्रष्टाचार काढायचा असेल तर भाजपची सत्ता हवी. यासाठी बिहारप्रमाणे कोल्हापुरातही सुप्त लाट निर्माण करावी लागेल.

आयआरबीच्या माध्यमातून टोल लादला होता. हा टोल घालविण्याचे काम भाजपने केले. राज्य सरकारच्या वतीने आयआरबीला पैसे देताना महापालिकेचा हिस्सा मागितला नाही. राज्य सरकार म्हणून सर्व पैसे भागविले, असे आ. पाटील यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER