त्यांची भांडण कधी तरी चव्हाट्यावर येतीलच- चंद्रकांत पाटील

पुणे : राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांच्यातला वाद, मराठा आरक्षण, राज्यातील कोविडची स्थिती हाताळण्यात आलेले अपयश यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये भांडणे सुरू आहेत. ही भांडणे कधी तरी चव्हाट्यावर येतीलच, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणालेत. पुण्यात एसएनडीटी येथील एका कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील पत्रकारांशी बोलत होते. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये धुसफूस सुरू आहे हे आम्ही वारंवार सांगत आलो आहोत. तुमची आपापसातली भांडणे आणखी किती दिवस लपवून ठेवणार आहात? कधी तरी ते चव्हाट्यावर येणारच आहेत. तसेच काही दिवसांत महाविकास आघाडी सरकारमधील आणखी प्रकरणे बाहेर येतील, असा दावाही त्यांनी केला.

शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा गुण लागला
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी एका वारकऱ्याबाबत वापरलेल्या अपशब्दावरून त्यांच्यावर सर्व समाजातूनच टीकेची झोड उठविली जात आहे. यावर भाष्य करताना पाटील म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा हम करे सो कायदा, अरेरावी, भ्रष्टाचार हा स्थायिभाव आहे. आता त्यांच्याबरोबर सत्तेत राहून शिवसेनेला त्यांचा हा गुण लागला आहे. एका शिवसेनेच्या आमदाराने माझ्या कार्यालयात चिठ्ठी घेऊन येऊन येणाऱ्या नागरिकांनाच लस मिळेल, असा फतवा काढला आहे. यावर काँग्रेसच्या आमदारानेच प्रत्युत्तर दिले आहे, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांना टोमणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची भेट घेतली. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री यांनी या निमित्ताने का होईना बैठका, भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी खरं तर मराठा आरक्षण, कोविड संकट यांच्याबाबत डबल मास्क, पीपीई किट घालून एक ते दीड वर्षांपूर्वीच या गोष्टी करायला हव्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button