… तर हसन मुश्रीफांना मलाच विकावे लागेल! चंद्रकांत पाटलांनी घेतली फिरकी

Chandrakant Patil AND Hassan Mushrif

कोल्हापूर : हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला आणि मी हारलो तर त्यांना मलाच विकून पैसे वसूल करावे लागतील! अशी फिरकी भाजपाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी घेतली.

काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना, तुम्ही जामिनावर बाहेर आहात, त्यामुळे सांभाळून बोला, असा सूचक इशारा दिला होता. यावर हसन मुश्रीफ यांनी आक्षेप घेत लोकशाहीमध्ये अशाप्रकारे धमकावणे योग्य नाही. गेल्यावेळीही चंद्रकांत पाटील यांनी आमचा अपमान केला होता. आता मी त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे म्हटले होते.

याला उत्तर देताना पाटील म्हणालेत – हसन मुश्रीफ यांनी माझ्यावर खुशाल अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा. मी त्याला घाबरत नाही. माझी सर्व प्रॉपर्टी विकली तर १०० कोटी काय १ कोटीही मिळणार नाहीत. त्यामुळे हा खटला हसन मुश्रीफ यांनी जिंकला तर त्यांना मलाच विकावे लागेल!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button