अजित पवारांविरुद्ध लढले म्हणून पडळकरांना विधानपरिषदेचे तिकीट- चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil - Gopichand Padalkar-Ajit Pawar

मुंबई : भाजपने विधानपरिषदेसाठी वरिष्ठ नेत्यांना बाजूला सारून नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यात प्रामुख्याने धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांचाही समावेश आहे. मात्र पक्षातील ज्येष्ठांना डावलत नवीन लोकांना संधी कशी काय मिळाली याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले होते. आता खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पडळकरांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी तिकीट मागितले नव्हते. गोपीनाथ पडळकर यांना विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या विरुद्ध लढण्यासाठी भाजपाने घोड्यावर बसवलं, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा:- कोरोनानंतर कॉंग्रेसमध्ये मोठा भूकंप होणार; थोरातांनी, खडसेंपेक्षा पक्षाची चिंता करावी – चंद्रकांत पाटील 

त्यामुळे गोपीचंद पडळकर यांना विधानपरिषदेचे तिकीट दिले असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. विधानसभेच्या निवडणुकीत पडळकर यांचा अजित पवारांनी दारुण पराभव केला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींच्या सभेवर बहिष्कार टाकून ‘गो बॅक मोदी’ असा नारा लगावला होता. नरेंद्र मोदी यांच्या सभेवर बहिष्कार टाकणाऱ्या नेत्याला विधानपरिषदेची उमेदवारी दिली जाते. मात्र अनेक वर्षे निष्ठेने काम करणाऱ्यांना डावलले जाते. त्यामुळे भाजपा कोणत्या दिशेने चालली, यावर चिंतन करण्याची गरज असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला