चंद्रकांत पाटील यांना आता विश्रांतीची गरज : जयंत पाटील

Jayant Patil & Chandrakant Patil

सातारा :  महाराष्ट्रात चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याशिवायही अनेक विषय आहेत. चंद्रकांत पाटील मात्र पुण्याच्या, कोल्हापूरच्या की राज्याच्या राजकारणात राहायचे, याविषयीच्या चर्चेत राहून स्वतःला मर्यादित करत आहेत. परंतु, खरे म्हणजे त्यांना आता विश्रांतीची गरज आहे, असा टोला जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी साताऱ्यात काल लगावला. पुणे-बंगळूर महामार्गावर जोशी विहीर (ता. वाई) येथे सातारा जिल्हा बँकेच्या एटीएम सेंटरचे उद्घाटन जयंत पाटील यांच्या हस्ते झाले.

त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.  पाटील म्हणाले, घटक पक्षांत चांगला समन्वय आहे. राज्यात अनेक वर्षे धरणांची व उपसा सिंचन, कालव्यांची कामे प्रलंबित आहेत. या प्रलंबित कामांना चालना देण्याला आमचे प्राधान्य आहे.

रोज काही तरी बोलून चर्चेत राहण्यापेक्षा चंद्रकांत पाटील यांनी आता विश्रांती घेतली पाहिजे, कोरोना प्रादुर्भावाच्या झालेल्या परिणामातून बाहेर पडून सरकार आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष जबाबदारीने विकासाला गती देण्याचे काम करत आहेत. आम्ही राज्याच्या हस्ते महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. राज्य सरकारचे एक वर्ष कोरोना आपत्तीतून बाहेर पडण्यात गेले आहे. त्यामुळे सरकार आता पूर्ण गतीने कामाला लागले असल्याचे पाटील यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER