चंद्रकांत पाटलांनी घेतली राज्यपालांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात

chandrakantpatil & Governor Bhagat Singh Koshyari

मुंबई : कालच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या यादीचा प्रस्ताव दिल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची अचानक भेट घेतली. त्यांनी घेतलेल्या भेटीमुळे अनेक राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ही भेट नेमकी कोणत्या विषयावर होती? याबाबतची माहिती मिळूशकलेली नाही.

चंद्रकांत पाटील यांनी आज दुपारी राज्यपालांची अचानक भेट घेतली. या त्यांच्या भेटीचा कार्यक्रम नियोजित नव्हता. त्यामुळे नेमकी भेट कशासाठी होती, याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. मागील दोन दिवसांपासून रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना केलेल्या अटके प्रकरणात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांच्याकडून करण्यात आली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे सोमवारपासून राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पिकाच्या आणि इतर नुकसानी संदर्भातील मदत देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. मात्र, अद्यापही या मदती संदर्भात प्रशासकीय पातळीवर प्रचंड मोठा गोंधळ आहे.

तर दुसरीकडे शिक्षक-पदवीधरांच्या निवडणुकीची आचारसंहिता राज्यात सुरू असल्याने ही मदत देण्यासाठी अडचणी उभ्या राहिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ही चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल सोबत चर्चा केली असल्याची माहिती पुढे येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER