
मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) साहेबांना राज्याचे नेतृत्व करण्याची वेळ आली तर ते अजित पवारांना नाही तर सुप्रिया सुळेंनाच मुख्यमंत्री करतील, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी केले आहे .एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ या कार्यक्रमात पाटील बोलत होते. हे माझं विश्लेषण आहे. ही माझी माहिती आहे. शरद पवारांचं तसं करणं चुकीचंही नाही.
त्यांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करावं वाटणं हे चूक नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. अजित पवारांचं (Ajit Pawar) कौतुक केल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींना काय काय बोलणी खावी लागलीत याची माहिती आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. मात्र हे चुकीचं नाही, त्यांच्या मुलीबद्दल प्रेम असणं स्वाभाविक आहे, हे माझं विश्लेषण आहे, यावर मी ठाम आहे, असेही ते म्हणाले. सर्वसामान्य माणूस म्हणून सांगायचं झालं तर शरद पवारांना संधी आली तर सोडून गेलेल्या अजितदादांना उपमुख्यमंत्री करायचं असतं. तिथं जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांना करायचं नसतं.
वेळ आली तर पिंपरीत पार्थ पवार, जिल्हा बदलून जायचं असेल तर रोहित पवारांना संधी मिळते, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी ८० तासांच्या सरकारआधी बैठकीत काय घडलं होतं यावर बोलणं चंद्रकांत पाटील यांनी टाळलं. प्रियम गांधी यांच्या पुस्तकाबद्दल ऐकून आहे, ते पुस्तक वाचण्याची उत्सुकता आहे, असं ते म्हणाले. एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ या कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Leader Chandrakant Patil) बोलत होते. मी स्वत: शरद पवारांवर पीएच.डी. करतोय.
स्वत:भोवती राजकारण फिरवत ठेवण्याचं कौशल्य खरोखर मोठं आहे. पवारांबद्दल मी अनेकदा गौरवोद्वार काढले. शेती, साखर या गोष्टीत त्यांच्याएवढा अभ्यास कुणाचा नाही. मराठा आरक्षणाबाबतच्या वक्तव्यावरून मी पवारांवर ते वक्तव्य केलं. मात्र ते व्यक्तिगत त्यांच्याबाबत नव्हतं, ओव्हरऑल नेत्यांबद्दल होतं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला