चंद्रकांत पाटील यांनी १२ वर्षे पाट्या टाकल्या, त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात मते मागण्याचा अधिकार नाही

Chandrakant Patil - Satej Patil

इचलकरंजी : महाविकास आघाडीची वर्षपूर्ती त्या पार्श्वभूमीवर भाजपची ठाकरे सरकारवर आगपाखड सुरू असताना आता पालकमंत्री सतेज पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर घणाघात केला आहे.

सद्य:स्थितीत भाजप फक्त राजकारण करत असून कोल्हापूरची भूमी सोडून पुण्याला गेलेल्या चंद्रकांत पाटील यांनी १२ वर्षे पाट्या टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असून त्यांना जिल्ह्यात मते मागण्याचा अजिबात अधिकार नाही, असा घणाघात पालकमंत्री सतेज पाटील (Satej patil) यांनी केला. “राज्यात महाआघाडीचे सरकार हे कुणाला संपवण्यासाठी नाही तर सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी अस्तित्वात आलं आहे. राज्य सरकार मराठा आरक्षण आणि वीज बिलाबाबत गंभीर असून हे प्रश्न लवकरच मार्गी लागतील, असं सतेज पाटील म्हणाले.

हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येथे  पुणे पदवीधर मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार डॉ. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या मेळाव्यात पालकमंत्री सतेज पाटील बोलत होते. “जातीयवादी भाजपला दूर ठेवण्यासाठी या दोन्ही निवडणुका महत्त्वाच्या आहेत. पदवीधर व शिक्षकांच्या अडचणी अरुण लाड व डॉ. जयंत आसगावकर हे प्रभावीपणे मांडू शकतात. त्यामुळे हातकणंगले तालुक्यात या दोघांना मताधिक्य देणार आहे. ” असं आमदार राजूबाबा आवळे म्हणाले.

महाआघाडीच्यावतीने उत्कृष्ट काम सुरू  असून करवीरनंतर हातकणंगले तालुक्यात मतदारसंख्या जास्त असल्यामुळे जितका निधी जास्त तितके मताधिक्य जास्त देणार असल्याचे आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी दिले. यावेळी हातकणंगले तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER