उद्धव ठाकरे यांनी सोबत घेतलेल्या दोन भुतांचा देवावर विश्वास नाही : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

मुंबई : राज्यातील मंदिरे खुली करण्यात यावी, या मागणीसाठी राज्यातील भाजपाने (BJP) शनिवारी ‘दार उघड उद्धवा दार उघड’ या आंदोलनाला सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi) निशाणा साधला .

ही बातमी पण वाचा:- दारूच्या दुकानाबाबत आस्था दाखवता मग प्रार्थना स्थळाबद्दल का नाही : फडणवीस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आणि त्यांच्या वडिलांचा देवावर विश्वास होता. पण उद्धव ठाकरे यांनी सोबत घेतलेल्या दोन भुतांचा देवावर विश्वास नाही. त्यामुळे तुमची पण देवावर श्रद्धा नाही असे आता म्हणावे लागेल , अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले .

दरम्यान मिरज येथे पाटील यांच्या नेतृत्वात ‘घंटानाद’ आंदोलन करण्यात आले . यावेळी उद्धवा दार उघड अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मंदिर न उघडण्याच्या निर्णयाबाबत घणाघाती टीका केली. सरकारकडून आता दारूचे दुकान रेस्टॉरंट हॉटेल मॉल्स उघडण्यास परवानगी देण्यात येत आहेत. मात्र मंदिर उघडण्याबाबत सरकार निर्णय घेत नाही. देशभरात सगळ्या ठिकाणी आता मंदिरात सुरू झालेली आहेत. मात्र महाराष्ट्रातील सरकार मात्र मंदिर उघडण्यास तयार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER