उद्धवजी, तुमची प्रतिमा कशीही असो, महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होणार नाही याची काळजी घ्या : चंद्रकांत पाटील

CM Uddhav Thackeray - Chandrakant Patil

मुंबई : भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जनसंपर्कासाठी नियुक्त केलेल्या खासगी संस्थेच्या टेंडरवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या मनात सरकारविषयीचा दृष्टिकोन बदलण्यासाठी एका खासगी कंपनीला सहा कोटी रुपयांचे टेंडर दिले, असा आरोप त्यांनी केला.

“जनसंपर्कासाठी खर्च केलेल्या सहा कोटी रुपयांमध्ये २५ ते ३० हजार लोकांच्या कोरोना (Corona) चाचण्या झाल्या असत्या. हा विचार राज्य सरकारने करायला हवा होता. उद्धवजी, तुमची प्रतिमा चांगली-वाईट कशीही असो, या कठीण काळात कमीत कमी महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होणार नाही याची तरी काळजी घ्या.” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

महाराष्ट्र सरकारने एका खाजगी संस्थेला स्वतःच्या जनसंपर्कासाठी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यासाठी काही दिवसांपूर्वी सुमारे सहा कोटी रुपयांचं टेंडर काढलं आहे. राज्य सरकारला असं वाटत आहे की, जनतेचा त्यांच्याविषयी असलेला दृष्टिकोन बदलण्यात त्या संस्थेने मदत करावी. म्हणजे सरळ सरळ जनतेची दिशाभूल करून त्यांना चुकीच्या दिशेने नेण्यास प्रवृत्त करावं, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER