आरक्षण प्रकरणी महाविकास आघाडीने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला; चंद्रकांत पाटलांचा आरोप

chandrakant-patil-criticizes-mahavikasaghadi-government

मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला . मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची टीका पाटील यांनी केली.

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाकडून (BJP) दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनादेखील विविध मुद्यांवर चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे. शिवसैनिकांकडून माजी नौदल अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणप्रकरणावर भाष्य करताना, शिवसेना दादागिरी करत असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान शिक्षण आणि नोकऱ्यांमधील मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने (SC) बुधवारी स्थगिती दिली. मात्र, या आरक्षणाचा आधीच मिळालेला लाभ अबाधित राहणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. हे प्रकरण अधिक न्यायाधीशांच्या पीठाकडे वर्ग करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे.

ही बातमी पण वाचा : राजू शेट्टी यांनी मराठा आरक्षणासंदर्भात ठाकरे सरकारकडे केली ‘ही’ मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER