राहुल गांधी म्हणजे राजकीय विनोदरत्न ; चंद्रकांत पाटलांची टीका

Maharashtra Today

मुंबई :- देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. काही दिवसांपूर्वी सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पुनावाला यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘मोदी मित्र’ (Modi Mitra) म्हणत टीका केली होती. त्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका (chandrakant-patil-criticized-rahul-gandhi) केली आहे.

राहुल गांधींना सिरमच्या घोषणेमुळे मोदींच्या मित्रांचा फायदा दिसत आहे. सध्या कोरोनाची लागण झालेले काँग्रेसचे नेते आणि देशातील एकमेव राजकीय विनोदरत्न राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर सध्या परिणाम झाला आहे, असे म्हणत पाटील यांनी गांधींवर निशाणा साधला .

महाराष्ट्राच्या हितासाठी मित्रपक्षांतील नेत्यांना वायफळ बडबड करण्यापासून रोखावं, असा सल्ला देखील त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांना दिला आहे.

तुमच्याकडे राहुल गांधी यांना जागा दाखवायची आणि सिरमकडून शक्य तितक्या अधिक लसी घेण्याची नामी संधी चालून आली असल्याचेही पाटील म्हणाले .

सिरमने आपल्या लसीची किंमत पारदर्शकपणे लोकांसमोर ठेवली आहे. आजही जगातील अन्य सर्व लसीपेक्षा सिरमची लस स्वस्त आहे. राहुल गांधी यांची ही भूमिका देशविरोधी आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी ठाकरे सरकारवर देखील निशाणा साधला. महाराष्ट्राचं हे दुर्भाग्य आहे की त्याला आजच्या कठीण काळात अशा संकुचित विचारांचे सरकार मिळाले, अशी टीका पाटील यांनी केली आहे.

ही बातमी पण वाचा : चंद्रकांत पाटील, तुम्ही पुण्याचे सेवक आहात की पुनावालाचे, नाना पटोलेंचा खोचक प्रश्न

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button