सासूरवासिनीने माहेरात ढवळाढवळ करणं बरं नव्हे : कृती समिती

chandrakant-patil

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी टीका करुन कोरोना लढ्यात काम करणाऱ्यांना नाउमेद करु नये. पाटील यांनी कोल्हापूरच्या जनतेला वाऱ्यावर सोडले. मात्र, शाहू महाराजांची पुरोगामी जनता प्रशासनाच्या सहकार्याने कोल्हापूरचे रक्षण करायला खंबीर आहे, असे सांगत सासूरवासीनीने माहेरात ढवळाढवळ करणे योग्य नाही, असा सल्ला कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यानी पत्रकाव्दारे दिला आहे.

पालकमंत्री आणि सर्व लोकप्रतिनिधी सोशल डिस्टन्शन सांभाळून एकमेकांच्या संपर्कात राहून प्रसंगी नागरिकांशी संवाद चर्चा करुन आपतीकालीन यंत्रणा राबवत आहेत. त्यामुळे कोण हम करेसो कायदा चालवत आहे हे जनतेला माहिती आहे. गेली दोन महिने चंद्रकांत पाटील कोठे होते? आत्ताच त्यांना कसा साक्षात्कार झाला? या महामारीत कोणत्याही तालीम संस्था, मंडळे गप्प बसलेली नाहीत. आपआपल्या परीने या लढ्यात लढत आहेत. आपत्तीच्या काळात कोल्हापूरात सर्व यंत्रणा व्यवस्थित कार्यरत असताना अचानकपणे येऊन अशी चुकीची वक्तव्य करुन वातावरण गढूळ करु नका, असल्याचे कृती समितीने म्हटले आहे.

पत्रकावर अशोक पोवार, रमेश मोरे, माणिक मंडलिक, अँड.पंडितराव सडोलीकर, सुभाष देसाई, विनोद डुणुंग, बाबासाहेब देवकर, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला