शिवसेनेला आता केवळ पवारांची भाषा कळते – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

मुंबई :- जतनेचा विश्वासघात करून आलेल्या महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजप प्रबळ विरोधी पक्ष म्हणून संघर्ष करणार आहे. सत्तेत आलेल्या शिवसेनेला केवळ पवारांचीच भाषा कळते. महाराष्ट्राचं सरकार विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चालवत नाहीत. ठाकरेंबाबत नक्कीच काहीतरी गडबड आहे. सत्तेसाठी त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली गेल्याची खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर केली आहे.

ही बातमी पण वाचा : नक्कीच काहीतरी गडबड आहे, उध्दव ठाकरे दबावाखाली आहेत – चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघे भाऊ-भाऊ आहेत केव्हाही एकत्र येतील, असं दोन दिवसांपूर्वीच बोलणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी शिवसेना हीच भाजपचं लक्ष्य राहील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी त्यांच्याबरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल आणि शिवसेनेसोबत पुन्हा सत्ता स्थापन करता येईल, अशी आशा भाजपाच्या काही नेत्यांना आहे. या अनुषंगाने भाजपा नेते भाकीतही वर्तवीत आहेत. मात्र स्वप्नात न रंगता शिवसेनेविरुद्ध आक्रमक विरोधी पक्षाची भूमिका निभावण्याचे आम्ही ठरवल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.


Web Title : Shivsena now only knows the language of Pawar – Chandrakant Patil

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)