राष्ट्रवादीतील संभाव्य प्रवेश रोखण्यासाठी चंद्रकांत पाटील यांचा नाथाभाऊंना फोन

Eknath Khadse- Chandrakant Patil.jpg

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे आपली कन्या खडसे-खेवलकर यांच्यासह येत्या गुरुवारी (ता.२२) राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. खडसेंच्या मुंबईत होणाऱ्या प्रवेश सोहळ्यासाठी तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. खडसे यांच्या समर्थकांनी भाजपचे चिन्ह खडसेंच्या फ्लेक्सवरून हटविण्यास सुरुवात केली आहे.

मात्र दुसरीकडे भारतीय जनता पक्षाकडूनही खडसेंना थोपविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी खडसे यांच्याशी संपर्क साधून त्यांनी पक्ष सोडून जाऊ नये यासाठी चर्चा केली. याला खडसे यांनीही दुजोरा दिला. या दोघांमध्ये काय चर्चा झाली, हे मात्र त्यांनी सांगितले नाही. हा फोन खडसे यांचा राष्ट्रवादीतील संभाव्य प्रवेश रोखण्यासाठीच असावा, अशी राजकीय चर्चा आहे.

पुण्यात चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी याबाबत आज पुन्हा विचारले. खडसेंच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशाबद्दल त्यांनी खंडन केले. ते कुठेही जाणार नाहीत, सगळ्यांचा हिरमोड होणार. भाजपचं नुकसान होईल, असे खडसे वागणार नाहीत. प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला एकनाथ खडसे उपस्थित होते. खडसे नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर करतोय. ते पुन्हा सक्रिय होतील, असे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER