पक्षवाढीसाठी राज ठाकरेंनी फिरलं पाहिजे; चंद्रकांत पाटलांचा सल्ला

Raj Thackeray-Chandrakant Patil

मुंबई: राज्यातील ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी पक्षवाढीसाठी राज्यभर फिरलं पाहिजे. त्यामुळे आपली ताकद दिसून येते, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांनी दिला.

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हा सल्ला दिला. महापालिका निवडणुकीत मनसेचा किती परिणाम होऊ शकतो, हे सांगता येईल. पण ग्रामीण भागात ग्रामपंचाययत निवडणुकीत त्यांचा किती परिणाम होईल हे सांगू शकत नाही, असं सांगतानाच राज ठाकरे यांना माझी एक सूचना राहील. त्यांनी पक्षवाढीसाठी फिरलं पाहिजे. फिरल्याने आणि प्रत्येक निवडणूक लढवल्यामुळे आपल्याला किती जनाधार मिळतो हे कळतं, असं पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी मनसेबरोबरच्या युतीची शक्यता फेटाळून लावली. मनसेबरोबर आम्ही युती करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER