शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांना कोरोनाची बाधा

Chandrakant Khaire Covid Postive

औरंगाबाद : शिवसेना (Shivsena) नेते तथा औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) हे कोरोना (Corona) बाधित झाले आहेत. त्यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खैरे यांनी स्वतः सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली.

चंद्रकांत खैरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी लिहिले, “माझी आज कोरोना चाचणी पॉझिटिव्ह  आली असून कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी. माझी प्रकृती ठीक असून खबरदारीचा उपाय म्हणून खाजगी रुग्णालयात दाखल झालो आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईन. ” खैरे शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समृद्धी महामार्ग पाहणी दौऱ्यात सहभागी होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER