महापालिका निवडणूकांपूर्वी औरंगाबादचे नामांतर होणार, चंद्रकांत खैरे यांचा दावा

Chandrakant khaire

मुंबई : कोणी कितीही विरोध केला तरी औरंगाबादचे नामांतर होणारच. महापालिकेच्या निवडणूकीपूर्वी नामांतराचा निर्णय होईल, असा दावा शिवसेनेचे माजी खासदार खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी दादर येथील त्यांच्या स्मृतिस्थळावर खैरे आले होते. तेव्हा ते बोलत होते. ‘८ मे १९८६ ला आम्ही सगळे निवडून आल्यानंतर आम्ही औरंगाबादमध्ये विजयी मेळावा घेतला होता तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी आपण संभाजीनगर असं नाव या शहराला देऊ, असं जाहीर केलं होतं. तसंच, आम्ही संभाजीनगरच म्हणणार, असंही ते म्हणाले होते, असं खैरे म्हणालेत.

औरंगाबाद हे शिवसेनाप्रमुखाचे औरंगाबाद आवडते शहर आहे. साहेबांनी म्हटलं तसं आम्ही संभाजीनगरच नामांतर करणारच, कोणीही किती विरोध केला तरी. महापालिकेच्या निवडणूकीपूर्वी नामांतराचा निर्मण होईल. संपूर्ण जनतेला संभाजीनगर नामांतर हवे आहे, असे ते म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER