हॅट्रीकचे स्वप्न चंद्रकांत दादांची बोल्ड उडणार : सतेज पाटील

Chandrakant Patil-Satej Patil

कोल्हापूर : पुणे पदवीधर मतदारसंघात हॅट्रीकचे स्वप्न चंद्रकांत दादांनी (Chandrakant Patil) पाहू नये या वेळी त्यांची बोल्ड उडणार आहे असा टोला पालकमंत्री सतेज पाटील यांनी लगावला. शिवाजी पेठ येथील मतदान केंद्रावर भेटीसाठी आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी पालकमंत्री पाटीलम्हणाले, पुणे पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदारसंघात पक्षीय पातळीवर पहिल्यांदाच निवडणूक मतदार नोंदणी पासून मतदाना पर्यंत मायक्रो प्लॅनिंग केले आहे. पुणे सोलापूर सांगली सातारा पक्षाची यंत्रणा मतदारांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवार निश्चितपणे विजय होतील असा दावा मंत्री पाटील (Satej Patil) यांनी केला.

भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांची मतदान केंद्रावर भेट झाली याविषयी विचारले असता एकमेकांना समोर आल्यानंतर नमस्कार करणे आदर भावना व्यक्त करणे यात गैर काही नाही याचा वेगळा अर्थ काढू नये अस ते यावेळी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER