चंद्रकांत दादा मुळे कोल्हापूरचे प्रकल्प रखडले : हसन मुश्रीफ

Hassan Mushrif-Chandrakant patil

कोल्हापूर : नागणवाडी, आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांना पॅकेज देण्याचा निर्णय झाला आहे. गेली तीन वर्षे हा प्रस्ताव पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या टेबलवर आहे. त्यांच्यामुळेच हे प्रकल्प रखडल्याचा आरोप माजी जलसंपदामंत्री, आ. हसन मुश्रीफ यांनी सोमवारी केला. प्रकल्पांचे रखडलेले प्रश्‍न मार्गी लावा, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांनी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. याबाबतचा निर्णय झाला नाही, तर पालकमंत्र्यांंच्या घरासमोर आंदोलन करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

सरकारने गेल्या पावणे पाच वर्षांत 12 टी.एम.सी.पैकी एक थेंबही पाणी अडवले नाही. प्रकल्पाचा एक खडा सुध्या इकडून तिकडे केला नाही, असा आरोप करत मुश्रीफ म्हणाले, भूसंपादनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत प्रकल्पाचे काम सुरू होणार नाही, यामुळे प्रकल्पग्रस्तांना पॅकेज दिले पाहिजे.मात्र, त्याला महसूलमंत्री अद्याप मंजूरी देत नाहीत. त्यांनी राज्य आणि देशाचे बघण्यापेक्षा, जिल्ह्यात काय चालले ते बघावे, तुम्ही पुढच्या पिढीचे किती नूकसान करणार असा सवाल करत नागणवाडी, आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांच्या पॅकेजबाबत आठ-दहा दिवसांत निर्णय झाला नाही तर तुमच्या घरासमोरच आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी आमदार मुश्रीफ यांनी पालकमंत्री पाटील यांना दिला.

ही बातमी पण वाचा : कोल्हापुरातील हृदयरोग तज्ञ डॉ सचिन पाटील यांचा स्तुत्य उपक्रम