ईडीचा दणका : चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना अटक

Chanda Kochhar & Deepak Kochhar

मुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) अटक केली आहे. आयसीआसीआय बँक व्हिडीओकॉन केस प्रकरणात ईडीने त्यांना अटक केली. एएनआयने याबाबतचे वृत्त प्रसारित केले आहे.

व्हिडीओकॉनला दिलेल्या कर्ज प्रकरणात चंदा कोचर यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला होता आणि त्यांच्या पतीला म्हणजेच दीपक कोचर यांना फायदा मिळवून दिला होता असा आरोप ईडीने त्यांच्यावर लगावला आहे.

चंदा कोचर आणि त्यांच्या पतीविरोधात PMLA नुसार ईडीने गुन्हा नोंदवला होता. दीपक कोच्चर हे व्हिडीओकॉनची उपकंपनी असलेल्या नू पॉवर या कंपनीचचे संचालक होते. मुळात नू पॉवर ही कंपनी केवळ कागदोपत्री होती. आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोच्चर यांनी पदाचा गैरवापर करीत बँकेद्वारे नू पॉवर कंपनीला तब्बल १८७५ कोटी रुपयांचे कर्ज दिले, असा आरोप आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER