पुढील आठवडयात पावसाची शक्यता

Heavy Rainfall

नवी दिल्ली : उत्तर हिमालयातील वातावरण बदलामुळे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मिरमध्ये जोरदार बर्फवृष्टी आणि पाऊस सुरू आहे. यामुळे दिल्ली आणि पंजाबमधील थंडीचा कडाका कमी झाला आहे. वातावरण बदलामुळे १६ ते २० फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडूत अवकाळी पावसाची शक्यता आहे.

देशातील अनेक ठिकाणचे वातावरण बदलत असून उत्तर हिमालयातील काही भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. तसेच अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. यामुळे उत्तर प्रदेश, पंजाब आणि दिल्लीचा थंडीपासून बचाव झाला आहे. पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भात वादळी वारे वाहू शकते. अशावेळी दिल्लीत वाताववरण स्वच्छ आणि कोरडे असेल. पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे दिल्ली, पंजाब, महाराष्ट्रातील काही भागातील तापमान ८ ते १० अंश सेल्सिअसवर राहू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER