उद्यापासून पुन्हा पावसाची शक्यता ; कोकणात शनिवारसाठी ऑरेंज अलर्ट

Kokan Rain

मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून पुन्हा मान्सून सक्रिय  होत असून, १२ सप्टेंबरपासून पुढील ४ ते ५ दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस (Heavy Rain) पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

शनिवारसाठी संपूर्ण कोकणला ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून बरसत असलेल्या मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणार आहे. बंगालचा उपसागर, आंध्रप्रदेश, ओरिसाजवळ निर्माण होणाऱ्या या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे १३ सप्टेंबरच्या आसपास विदर्भासह शेजारील भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात या काळात मान्सून सक्रिय  राहील. १४ आणि १५ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोराचा पाऊस होईल. कमी दाबाच्या क्षेत्रासह हवामानात होणाऱ्या बदलामुळे परतीच्या मान्सूनचा प्रवास उशिरा सुरू होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. १५ सप्टेंबरच्या सुमारास राजस्थानमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. मात्र यावेळी तो १५ दिवस लांबण्याची शक्यता आहे. मुंबईत गेल्या कित्येक दिवसांपासून पाऊस बेपत्ता आहे. आर्द्रतेमधील चढ-उतार आणि कमाल तापमानात होणारी किंचित वाढ यामुळे मुंबईचे वातावरण काहीसे तापदायक झाले आहे. ऊन, उकाडा आणि अधूनमधून बरसणारा पाऊस अशा तिहेरी मिश्रित वातावरणामुळे मुंबईकर त्रासले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER