खैरेंना पराभूत केलेल्या इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आव्हान

Uddhav Thackeray-Imtiyaz Jaleel

औरंगाबाद : चंद्रकांत खैरेंना पराभूत केलेल्या औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा शिवसेनेबरोबर माझा सामना होईल, त्यावेळी मी एमआयएमचे सात आमदार मराठवाड्यात निवडून आणेल, असा दावा जलील यांनी केला आहे . शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पराभवाची सवय करून घ्यावी, असा टोलाही जलील यांनी लगावला आहे. ते हैदराबादमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली .

ही बातमी पण वाचा :खैरेंचा पराभव हा माझा पराभव ! – उद्धव ठाकरे

शिवसेना गड मानला जाणाऱ्या औरंगाबाद मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील खासदार म्हणून निवडून आले. शिवसेनेच्या पराभवानंतर ते पुन्हा एकदा हिंदूंच्या सुरक्षेचा मुद्दा पुढं करत आहेत; मात्र हे चुकीचं आहे. त्यांच्याकडे दुसरा मुद्दाच राहिलेला नाही, असं जलील यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद लोकसभेतला पराभव फक्त चंद्रकांत खैरेंचा झालेला नाही. तर तो माझा पराभव झालाय, अशी खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली होती. त्यावर जलील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.