संजय राऊत, नारायण राणे आणि सुप्रिया सुळे यांच्यात ‘चाय पे चर्चा’

Chai pe charcha between Sanjay Raut,-Narayan Rane - Supriya Sule

मुंबई :राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्यासह सेना खासदार संजय राऊत, भाजपाचे नेते नारायण राणे, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, शिवसेना नेते अरविंद सावंत हे सगळे ‘चाय पे चर्चा’ करताना दिसत आहेत .

भाजपा नेते नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात किती वाद आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र त्यांचे अनेक नेत्यांशी वैयक्तिक संबंध खूप चांगले आहेत. हा फोटोही तेच दाखवून देतो आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला तेव्हा संजय राऊत हे सातत्याने भाजपाविरोधात बोलत होते. त्यावेळी नारायण राणे यांनीही शिवसेनेवर टीका केली होती. आज मात्र शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादीचे नेते दिलखुलासपणे चहाचा आस्वाद घेतानाचे चित्र आपल्यासमोर दिसत आहे .

या फोटोमध्ये नारायण राणे, संजय राऊत, अरविंद सावंत, सुनील तटकरे आणि सुप्रिया सुळे दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू याच गोष्टीची साक्ष पटवून देतं आहे की, या नेत्यांमध्ये मनमोकळी चर्चा झाली. आता चर्चेचा विषय काय होता ते समजू शकलेलं नाही; मात्र पाचही नेते छान हसत असल्याचे दिसून येते.