
कॅनबेराच्या (Canberra) मनुका ओव्हलवर गुरुवारी भारताने पहिल्या टी२० सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाला ११ धावांनी मात दिली आणि या विजयात सामनावीर ठरताना युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) इतिहास घडवला. बदली खेळाडू असूनही आंतरराष्ट्रीय सामन्यात सामनावीर पुरस्कार कमावणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. त्याने भारतीय संघात मध्यंतरानंतर रवींद्र जडेजाची (Ravindra Jadeja) जागा कॉन्क्यजन सबस्टीट्युट म्हणून घेतली आणि २५ धावात ३ बळी मिळवून भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. प्रतिस्पर्धी कर्णधार आरोन फिंच व स्टीव्ह स्मीथ असे खंदे फलंदाज त्याने बाद केले. त्याने ज्याची जागा घेतली त्या जडेजानेसुद्धा २३ चेंडूत ४४ धावा करताना भारताच्या धावसंख्येला आकार दिला होता.
चहल गोलंदाजीला आला तेव्हा ऑस्ट्रेलीयन संघ ५४ धावांच्या सलामीसह सुस्थीतीत होता पण त्याने फिंच व स्मीथ यांना लागोपाठच्या षटकार बाद करुन सामना फिरवला. जडेजाच्या पायाचा स्नायू दुखावला होता आणि त्या वैदनांसहच त्याने फलंदाजी केली पण या खेळीदरम्यान डावातील शेवटच्या षटकात त्याच्या हेल्मेटला चेंडू लागला आणि त्यामुळे त्याच्या जागी भारतीय संघाला कॉन्क्युजन सबस्टीट्युट मिळू शकला मात्र यामुळे बदली खेळाडूच्या या नियमावरच वाद निर्माण झाला आहे. मिेशेल स्टार्कच्या गोलंदाजीवर चेंडू जडेजाच्या बॅटीची वरची कड घेऊन हेल्मेटवर आदळला होता.
त्यानंतर उडालेला झेल बॅकवर्ड पॉईंटच्या जागी ऑस्ट्रेलियन संघाला टीपता आला नव्हता. यानंतर जडेजाची मैदानात कॉन्क्युजन चाचणी घेण्यात आली नाही पण सामन्यानंतर विराट कोहलीने सांगितले की तो चेंडू लागल्यानंतर जडेजाला गरगरल्यासारखे होत होते आणि सामना संपल्यानंतरही त्याला चक्रावल्यासारखेच वाटत आहे.
भारताला मध्यंतरात त्याच्या जागी कॉन्क्युजन सबस्टीट्युट मंजूर करण्यात आला याचा अर्थ आयसीसीच्या अधिकार्यांनी भारतीय संघाच्या डॉक्टरांचा सल्ला मान्य केला. भारतीय संघाचे अँटी डोपींग मॅनेजर अभीिजत साळवी व फिजीओ नितीन पटेल यांनी जडेजा खेळू शकणार नसल्याचा अहवाल दिला होता.
त्यामुळे चहल व जडेजा हे दोन्ही फिरकी गोलंदाज असल्याने लाईक टू लाईक रिप्लेसमेंट म्हणून चहलला संधी मिळाली. मात्र या निणर्यावर ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जस्टीन लँजर यांनी सामनाधिकारी डेव्हिड बून यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. रिस्टस्पिनरला फिंगर स्पिनर कसा बदली होऊ शकतो हा प्रश्न आता आहे. मात्र याचे अधिकार दोन्ही खेळाडूंची उर्वरीत सामन्यातील भूमिका बघून ठरवण्याचे अधिकार सामनाधिकार्यांना आहेत. यानंतर आता जडेजा दोनच दिवसात होणाऱ्या पुढच्या सामन्यात खेळण्याची शक्यता मावळली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला