पुढील महिन्यात होणार सीईटी परीक्षा : उदय सामंत

CET Exam

मुंबई :- राज्यातील रखडलेली सीईटी परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे १ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. या संदर्भातील वेळापत्रक दोन दिवसात सीईटी सेलच्यावतीने जाहीर करण्यात येईल. ही परीक्षा ऑफलाइन होणार की ऑनलाइन होणार याची माहिती वेळापत्रकासोबत देण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली आहे.

उदय सामंत यांनी म्हटले आहे की, उच्च व तंत्र शिक्षण विभाग सीईटी सेल मार्फत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) दिनांक १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२० दरम्यान घेण्याचा प्रयत्न आहे. याचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास चालू ठेवावा.

ही बातमी पण वाचा : पदवी परीक्षांच्याबाबत उदय सामंतयांची राज्यपालांशी चर्चा     

MT LIKE OUR PAGE FOOTER