
नवी दिल्ली : सिझेरियनने बाळंतपण करणाऱ्या खासगी रुग्णालयांविरुद्ध कारवाई करण्यासंदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. सिझेरियनने बाळंतपणसंदर्भात न्यायालयाने निर्देश द्यावेत अशी तुमची इच्छा आहे का असा सवाल न्यायालयानं याचिकाकर्त्याला केला.
खासगी रुग्णालये सिझेरियन करुन पैसे कमावत असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकराने नियमावली तयार करावी यासंदर्भात याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात मागणी केली होती. यावर, न्यायालयाचा वेळ खाल्ल्याचा आणि न्यायालयाच्या वेळेचा दुरुपयोग केल्याचा ठपका न्यायालयानं याचिकाकर्त्यावर ठेवला आणि यासाठी याचिकाकर्त्याला २५ हजारांचा दंडही ठोठावला.